११/१८/२०१९

कोकम सरबत


लागणारे साहित्य:

एक  किलो ताजी लाल कोकम,अडीच किलो साखर.एक  चमचा जीरेपूड.चवीनुसार मीठ.

कसे तयार कराल:

आधी कोकम स्वच्छ धुवून पुसून आतला बियांचा भाग काढून साफ करावे आणि तयार झालेल्या वाट्यांमध्ये साखर भरून ती मोठ्या काचेच्या बाटलीत अधेमधी साखरेचा थर देऊन भरावी.रोज बाटलीतील कोकम खालीवर हलवावी.काही दिवसांनी सर्व साखर विरघळली की, कोकमांचा अर्क गाळून घेऊन त्यात मीठ व जिरेपूड घालून सिरप बाटलीत भराव. आणि गरजेनुसार पाण्यात मिसळून सरबत तयार करावं आणि सर्व कराव. 

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search