११/१६/२०१९

महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट हिल स्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉईंटस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडनिंग पॉईंट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
येथील स्ट्रॉबेरीज, रासबेरीज, जांभळे, लाल रंगाचे मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.
राहण्या-जेवणाची येथे अत्यंत चांगली सोय आहे. एम्.टी.डी.सी.तर्फेही येथे निवास व्यवस्था आहे. मुंबई, पुणे, सातारा येथून थेट महाबळेश्वरला जाता येते. त्यासाठी तेथून खाजगी तसेच एस्.टी. बसेस नियमितपणे सेवा देतात. संपूर्ण महाबळेश्वर परिसर हिंडून पाहायचा असल्यास त्यासाठी किमान तीन-चार दिवस येथे मुक्काम करायला हवा.
नजीकचे रेल्वे स्टेशन : वाठार (पुणे-कोल्हापूर मार्ग)
मुंबई- महाबळेश्वर (पुणे मार्गे रस्त्याने) : २९० कि.मी.
मुंबई- महाबळेश्वर (महाड मार्गे रस्त्याने) : २४७ कि.मी.
पुणे- महाबळेश्वर अंतर : १२० कि.मी., सातारा- महाबळेश्वर अंतर : ७६ कि.मी.




















































संदर्भ: www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search