१२/११/२०१९

काल ती अवेळीच आली...
काल ती अवेळीच आली 
तेव्हा वाटले माझीच होणार...
पडून गळ्यात माझ्या ती
हुंदक्यांनी अशी दाटणार....
तोडून आले रे सारे बंध
म्हणत हमसुन रडणार.....
रडता रडता स्वतःबरोबर
मलाही अश्रुत भिजवणार...
दिलासा देताच कवेत घेऊन
स्वप्ने नवी दाखवणार...
प्रेमाच्या अशाश्वत दुनियेत
आमचे प्रेम सफल होणार....

काल ती अवेळीच आली
गळ्यात पडुन हमसुन रडली
कुजबुजली अर्धवट शब्दात
आता मी दुस-याची होणार...!

*अनिल सा.राऊत*

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search