१२/०७/२०१९

कांदा शेंगदाणे चटणी





आधी शेंगदाणे भट्टीवर भाजून आणायचे व त्यांचे खलबत्यात जाडसर कुट करायचे. कांदा बारीक चिरुन घ्यायचा.
कढाईत कांदा तेलामध्ये भाजून घेऊन त्यात सोलापुरी काळं तिखट, खलबत्यात केलेलं शेंगदाण्याचे कुट व चवीनुसार मीठ घालून परतुन घ्यायचं. मग त्यात कोथंबिर बारीक करुन घालायची.
झाली शेंगदाणा चटणी तयार...
जास्त तिखट हवं असल्यास हिरवी मिरची बारीक करुन वापरु शकता.


आपल्याला नक्कीच आवडेल खायला अशी कांदा घालून केलेली शेंगदाण्याची चटणी आणि सोबत ज्वारी किंवा बाजरीची भाकरी .


-प्रोमोद तांबे 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search