१२/१७/२०१९

शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती?

शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती?

शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती?
देव, देश अन धर्माचीही होत असे अशी माती!
शुर नाही सरदार आम्हाला लाज वाटते किती? || ध्रु ||

आईच्या गर्भात उमगते लाच खाण्याची रीत
पैशांशी हे लगीन लागत जडते येडी प्रीत
लाख संकट देऊनही हे पुढे करती छाती
देव, देश अन धर्माचीही होत असे अशी माती ! ... || १ ||

झुंजवावे अन काटून मारावे हेच तुम्हाला ठाव
लढवून मारावे मारून जगाव हेच तुम्हाला ठाव
पैशापायी सारी इसरला माया ममता नाती
देव, देश अन धर्माचीही होत असे अशी माती ! ... || २ ||

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search