१/१५/२०२०

मी मराठी????मी मराठी,मी मराठी,होय मी मराठी!
मी मरायलाही तयार आहे मराठीसाठी.

morningची सुरुवात good morningने होते,
हिँदी भैया मिल्या की हिंदीमध्ये बातचित होते.
Nightमध्ये dreamसुद्धा मराठी पडते.
हिँदितच बोलतो जरी मला भेटला मराठी.
असा मी मराठी मी मराठी....

माझे children conventमध्ये शिकतात.
आई बाबा नाही mumy pappa म्हणतात.
मला कळत नाही zpच्या शाळा का emptyअसतात.
मी नक्की काही तरी करणार मराठी शाळांसाठी.
असा मी मराठी मी मराठी....

मी मराठी englishमध्ये बोलतो.
प्रत्येक वाक्यात english word घालतो.
लोक म्हणतात मी englishच बोलतो.
असे म्हणणार्याला देईन मी काठी.
असा मी मराठी मी मराठी....

wifeमाझी upto date madam.
मी पण असतो english gentelman सम.
englishमध्ये लिहीतो माझे name.
special cakeची order असते birthdayसाठी.
असा मी मराठी मी मराठी....

छाती ठोकून मी सांगणार
यस आय अॅम अ मराठी (अमराठी)!
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search