१/१७/२०२०

कणकेचा हलवालागणारे साहित्य:

२ कप कणिक
दीड कप साजूक तूप
६ कप पाणी
अडीच कप साखर
२ चमचे वेलची पावडर
१० ते १२ बदाम अथवा काजू (बारीक तुकडे करून घेणे)
६ ते ७ बदाम (सजावटीसाठी उभे तुकडे करून घेणे)

कसे तयार कराल:

एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र उकळवून, साखर पूर्णपणे विरघळवून घ्या. दुसऱ्या भांड्यात २ मिनिटे कणिक परता. नंतर, कणकेत तूप घालून, कणिक गोल्डन ब्राऊन हेईपर्यंत चांगली परतून घ्या. स्वयंपाकघरात कणकेचा चांगला खमंग वास सुटेल. आच मंद करून परतलेल्या कणकेत हळूवारपणे साखरेचे पाणी घालता घालता सतत ढवळत रहा. या पाककृतीतील ही सर्वात महत्वाची क्रिया आहे. सतत ढवळणे गरजेचे असून, तसे न केल्यास हलव्यात गुठळ्या तयार होतील. त्याचप्रमाणे, साखरेचे पाणी हळूवारपणे टाकत राहणे गरजेचे आहे. काही वेळात हलवा घट्ट होण्यास सुरुवात होईल. वेलची पूड आणि काजूचे बारीक तुकडे घालून हलवा एकसंध होईपर्यंत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हे करत असताना हलव्याला बाजूने तुपाचा तवंग सुटायला लागेल. तयार झालेला हलवा सर्व्हिंग डिशमध्ये काढून उभ्या चिरलेल्या बदामाच्या तुकड्यांनी सजवा. कणकेचा हलवा तुम्ही डेझर्ट म्हणून अथवा नाश्त्याला पुरीबरोबर खाऊ शकता.


संदर्भ: Loksatta
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search