नमस्कार ,
लॉक डाऊन वाढलाय. आता पुढे काय करायचं?
तर इथे आहे तुमच्या साठी एक काम. तुम्ही लिहिता, वाचता. मग ते फक्त पेज वर का ठेवायचं?
मग काय करायचं?
आपल्या लघु कथा ज्या आपण लिहिता, त्याचं अभिवाचन करा, शूट करा आणि आम्हाला पाठवून द्या.
rsurvep2019@gmail.com वर.
चांगल्या कथा , अभिवाचन ह्या आम्ही आमच्या R Surve Productions ह्या युट्युब चॅनेल वर अपलोड करू.
लक्षात ठेवा कथा अभिवाचन करायचं आहे, नुसतं कथेचं वाचन नाही.
तुम्ही आणि तुमच्या घरातली मंडळी.
घरातल्या मंडळींसोबत वेळ घालवता घालवता अभिवाचन ही करा आणि पाठवा आम्हाला.
प्रवेश फी नाही.
नियम :-
१) कथा घरात शूट करायची आहे, लॉक डाऊन च्या नियमांचं पालन करून.
२) कथा अभिवाचन वेळ ४ ते ५ मिन.
३) कथा ह्या स्वलिखित असाव्यात.
४) कथा पाठवतांनाच, परवानगी पत्र पाठवायचं आहे.
५) 'लिहिली असलेली कथा ही स्वतःची असून ती अपलोड करण्यास परवानगी आहे.' अश्या आशयाचा द्राफ्ट मेल मध्ये व्हिडीओ सोबत लिहिलेला पाठवावा.
६) आयत्या वेळेस नियोजनात बदल करण्याचा हक्क R Surve Productions कडे असतील.
काय काळजी घ्यायची:-
१) ऑडियो आणि व्हिडीओ क्लियर असावा.
२) कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ४ पात्र असावीत.
चला तर मग , काहीतरी लिहुया आणि त्याचं अभिवाचन करूया.
टिप :- ही स्पर्धा नाहीये. तर प्रोत्साहन आहे कथा अभिवाचन ह्या क्षेत्राला.
धन्यवाद!!!
टिप्पणी पोस्ट करा