५/२२/२०२०

द्वितीय विश्वयुद्धात ताजमहालचे संरक्षण कसे केले हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल

हे सौंदर्य नितळ आहे. याची तुलना जगात कशाशीच होऊ शकत नाही. म्हणूनच तर हे जगातील मोजक्या आश्चर्यांपैकी एक आहे. पण कधीकधी अतिसौंदर्य ही किती जीवघेण असतं, हे आपण रोजच्या बातमीपत्रांतून वाचतच असतो. अशीच ताजमहालच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याच्या सौंदर्याची साऱ्यांना काळजी पडली ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. आपण म्हणजे ब्रिटीशांची वसाहत. त्यामुळे काही स्वयं स्फूर्तीने, काही परिस्थितीने तर काही अगदी जबरदस्ती या महासंग्रामात दाखल झाले.

त्यामुळे देशाचा पक्ष हा मित्र राष्ट्रांचा म्हणजे जर्मनी, जपान यांच्या विरोधातील ठरत होता. आजच्या नकाशावर पाहता दोन्ही देशांच्या भूमीविषयीच्या मर्यादा लगेचच स्पष्ट होतात, पण त्यांच्या महत्वकांक्षा म्हणजे काय हे त्यांचा या युद्धातील पराक्रम पाहूनच ध्यानात येतो. आपल्या सोबतच काहीश्या लहानग्यांना एकत्र करून आपण बलाढ्य टीमच्या विरोधात क्रिकेटचा सामना खेळावा आणी अक्षरशः या लिंबूटिंबू टीमनेच सामना जिंकण्या पर्यंत मजल मारत असतानाच इंग्लंड - न्युझीलंड वर्ल्डकप फायनलमध्ये जादू घडावी तशी जादू घडून निकालच बदलून जावा, इतकं हे प्रकरण चित्तथरारक होतं.आता इंग्लंडच्या वतीने आपल्या फौजांचा भरणा असल्याने, आपल्या विरोधात जपान आणि जर्मनच्या लुफ्तवाफे कडून एयरस्ट्राईक घडण यात काही नवल नव्हतं. आणि शत्रूला जास्तीत जात नुकसान पोहचवणे हाच तर युद्धाचा मुख्य उद्देश, त्यामुळे ताजमहालवर बॉम्बिंग होणारच अशी शक्यता मनाशी बाळगून, तत्कालीन ब्रिटीश प्रशासनाने आकशात उडणाऱ्या विमानांना चकवा देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने विचार करता, त्यांनी हि नामी शक्कल लढवली. मचाण भासावे अश्या पद्धतीने ताजमहालच्या घुमटावर १९४२ साली बांबू रचून ठेवले. काहीजण तर असेही म्हणतात कि संपूर्ण वास्तूच अश्या पद्धतीने झाकून टाकण्यात आली होती. पण फोटो अश्याच पद्धतीचे उपलब्ध आहेत.

पण ताजमहालला असं दडवून ठेवायची हि पहिली वेळ नव्हती. १९६५ - ७१, पाकिस्तान सोबतच्या दोन्ही युद्धातही या गोष्टीची पुनरावृत्ती घडली होती. पण त्याआधी महायुद्ध आणि आपल्या देशाचा त्यातील सहभाग समजून घेऊयात......!

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search